मुक्ताईनगर.(प्रमोद कोंडे ) : महाराष्ट्राची विधानसभा ही लोकशाही पद्धतीने चालते काल पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन झालं आमदाराने अशा पद्धतीचे गैरवर्तन करू नये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना मतदारांनी निवडून दिलं
[ads id='ads1]
त्या मतदारांचा महागाईबद्दल विषय न मांडता, शेतीविषयक शेतकऱ्यांच्या समस्या न मांडता केवळ हुकूमशाही व दादागिरी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला महाराष्ट्र विधानसभा ही सार्वभौम आहे त्याठिकाणी जनतेच्या हिताचे कायदे बनवण्याचे काम चालतं लोकप्रतिनिधीने गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका करायची असते परंतु आम्हाला सत्ता द्या आम्ही ओबीसीला आरक्षण देऊ ही अहंमपणाची भावना नष्ट झाली पाहिजे.अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिली आहे.