मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून रोज देण्यात येईल. असे रेखा ठाकूर प्रदेशाध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र.यांना कळविले
मेडिकल बुलेटिन ; वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी यशस्वी...
शुक्रवार, जुलै ०९, २०२१
