Maharashtra राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष बारावीच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2021 परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ऑगस्टपर्यंत लागू शकणार हा निकाल आता 21 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. 12वीचा निकाल कधी लागणार याकडेच विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.यंदा बारावीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसेच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा (intranal), असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघताना ओव्हरलोड झाल्यामुळे साईट क्रॅश झाली होती. ही अडचण बघता बारावीच्या निकालाच्या दिवशी अशी कोणतीही तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाकडून अजूनही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.
कसा पाहाल निकाल?
रिझल्ट पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
त्यानंतर Maharashtra HSC result 2021 क्लिक कर
त्यानंतर एक विंडो सुरु होईल.
इथे आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा.
त्यानंतर काही क्षणात रिझल्ट आपल्या स्क्रीनवर येईल.
या वेबसाईटवर पाहू शकाल निकाल :
mahahsscboard.maharashtra.gov.in.
या तीनही वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.