पत्रकार शरद भालेराव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित पुरस्काराची हॅट्ट्रिक; ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंंडेशनतर्फे गौरव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जळगाव प्रतिनिधी (फिरोज तडवी) गजानन क्षीरसागर चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंंडेशनतर्फे कृषीदिन तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त त्यांच्या नावाने दिला जाणार्‍या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण टाकळी प्र.चा. येथील संत सेवालाल महाराज विचारमंच येथे करण्यात आले. 

  यात सामाजिक कार्य व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन दै.‘जनशक्ती’चे उपसंपादक शरद भालेराव यांनाही उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात काही पुरस्कारार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात गौरविण्यात आले. उर्वरित पुरस्कारार्थींना ऑनलाइन सन्मानित करण्यात आले. 

  या वेळी गटविकास अधिकारी अजय पवार, विस्तार अधिकारी कैलास माळी, देवेंद्र नाईक, कांतीलाल राठोड, काशिनाथ जाधव, अ‍ॅड.भरत चव्हाण, पत्रकार योगेश्वर राठोड यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. मान्यवरांनी ग्लोबल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यशस्वितेसाठी राकेश गवळी, गजानन चव्हाण, सुरेश पवार, चिंतामण चव्हाण, मिलिंद भालेराव, भीमराव जाधव, उदल पवार, नामदेव राठोड, डॉ.संदीप चव्हाण यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!