पंतप्रधान मोदींची प्रेरणा घेऊन "मोदी चाय" विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वयोवृद्धाची हत्या

अनामित
कानपूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी वडनगर गुजरात राज्यातील असेलेल्या रेल्वे स्थानकावर चहा (Tea) विकायचे असे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारताचे पंतप्रधान मोदींची प्रेरणा घेऊन चहा विक्रीचा व्यवसाय (Business) करणाऱ्या वयोवृद्धाची एका अनोळखी व्यक्तीनं हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीनं 'मोदी चाय' नावानं छोटसं दुकान(Tea Shop)सुरू केलं होतं. पण मंगळवारी त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
[ads id='ads2]
 सविस्तर वृत्त असे की - मृत वयोवृद्धाचं नाव बलराम चसान असं आहे. हे उत्तर प्रदेशातील कानपूरन जवळील घाटमपूरच्या हजांबाड रस्त्यावर त्याचं एक लहानस चहाचं दुकान (Tea Shop) होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या छोट्याशा चहाच्या दुकाचं नाव 'मोदी चाय' ठेवलं होतं. दुकानाच्या नावामुळे त्यांच्या दुकानाला सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. बलराम हे चहाचं दुकानं चालवण्यासोबत भाजपच्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असत. अनेकदा ते कार्यक्रमात गाणेही गात. 

घटनेच्या दिवशी बलराम चसान हे आपल्या चहाच्या दुकानाजवळ असणाऱ्या एका रिसॉर्टमध्ये गेले होते. त्या ठिकाणी रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री खूप वेळ कार्यक्रम सुरू असल्यानं कार्यक्रमास्थळीच त्यांना खूप उशीर झाला. त्यामुळे ते रात्री उशीरा घरी जाण्या ऐवजी आपल्या चहाच्या दुकानाबाहेरच झोपी गेले

मंगळवारी सकाळी झोपलेल्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला आहे. अज्ञात व्यक्तीनं बलराम यांची दगडानं ठेचून हत्या केल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. 

बलराम यांचे दोन्ही डोळेही फोडले होते. चोरीच्या उद्देशातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा शोधही पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!