सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 11 जुलै 2021
✒️ 6 वर्षांनी चंद्रपुरात पुन्हा दारु विक्रीला सुरुवात, गेल्या 3 दिवसांमध्ये 1 कोटी रुपयांची दारु विक्री; उत्साहित बार मालकाने मंत्री विजय वडेट्टीवारांची केली आरती
✒️ जळगाव: देशसेवा करताना भडगाव येथील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे (29) हे लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना शहिद
✒️ महाराष्ट्रात 1,14,000 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,06,466 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,25,528 रुग्णांचा मृत्यू
✒️ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ऑनलाइन सर्वेक्षण; जवळपास 85 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची दर्शविली तयारी
✒️ हिजबुल प्रमुख सलाहुद्दीनच्या 2 मुलांसह काश्मीरचे 11 सरकारी कर्मचारी बरखास्त, दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप
✒️ भारत-श्रीलंका क्रिकेट: मालिकेत 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश, 18 ते 29 जुलैदरम्यान मालिकेचे आयोजन
✒️ भारतात 4,48,449 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,99,67,478 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,08,072 रुग्णांचा मृत्यू
✒️ मागील केवळ 6 महिन्यांत सिमेंटच्या दरात 40 टक्क्यांनी, तर स्टीलच्या दरात 50 ते 55 टक्क्यांनी वाढ
✒️ व्होडाफोन आयडियाची आर्थिक अडचण, 23 हजार कोटी जमवण्यासाठी पुन्हा सक्रिय; पहिल्या तिमाहीमध्ये 6,600 कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज
✒️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; आज पुण्यातील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार
✒️ कोल्हापूर: हाताने नव्हे, चक्क जेसीबीनेच गावभर उधळला गुलाल, पंचायत समिती पदाधिकारी निवडीमुळे कागल तालुक्यातील बानगे गाव चर्चेत
✒️ विम्बल्डन स्पर्धेच्या महिला एकेरी सामन्यात अग्रमानांकित बार्टीची बाजी; चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हाला 6-3, 6(4)- 7(7), 6-3 ने पराभूत करत चषक नावावर
✒️ अॅमेझॉनने नुकतीच केली अॅमेझॉन प्राइम डे सेलची घोषणा; 26 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता सेल सुरू होणार▪️ शाळा सुरू करा, मुलांना पाठवतो! शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 85 टक्के पालकांची संमती; राज्यातील कोरोनमुक्त गावात पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु होणार
▪️ जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी धडक मोहिमांचे सत्र सुरूच; शनिवारी उशीरा आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात घट
▪️ उत्तर प्रदेशात 'टु चाईल्ड पॉलिसी' जाहीर केली जाण्याची शक्यता. दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी, तसेच अन्य सरकारी योजनांचा लाभही मर्यादित केला जाण्याची शक्यता
▪️ ईडीची धडाकेबाज कामगिरी सुरुच, तळोजा जेलमध्ये सचिन वाझेचा जबाब, जवळपास सलग सहा तास चौकशी. आणखी दोन दिवस चौकशी चालणा
▪️ कोव्हॅक्सिनला लवकरच आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांचे सं
▪️ दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात; अन्य विषयांचा अभ्यासक्रमाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू, बोर्डाची संलग्न शाळांना पत्राद्वारे माहि
▪️ मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नों
▪️ अॅमेझॉनने नुकतीच केली अॅमेझॉन प्राइम डे सेलची घोषणा; 26 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता सेल सुरू होनार
▪️ सामना गमावला पण हरलीननं जिंकली प्रेक्षकांची मनं, 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅमी एलेन जोन्सनचा हरलीननं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायर
▪️ भारत-श्रीलंका क्रिकेट: मालिकेत 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश, 18 ते 29 जुलैदरम्यान मालिकेचे आयो