Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 14 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 14 जुलै 2021


✒️  स्पेसएक्स भारतात पुढच्या वर्षी हाय स्पीड सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरु करणार, भारतीय कंपन्यांसोबत कराराची तयारी सुरु


✒️ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया रशियन लस स्पुतनिक-व्ही तयार करणार; सीरमची सध्या कोव्हिशील्डची निर्मिती आहे सुरू


✒️ बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने सहकारी कंपनी असलेल्या रुची सोया या कंपनीचे एफपीओ बाजारात आणण्याची केली घोषणा


✒️ उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटना: देवऋषी इमारतीत स्लॅब कोसळून दोन जण जखमी, तीन महिन्यांत स्लॅब कोसळण्याच्या तीन दुर्घटना


✒️ मुंबईचे विमानतळ अखेर अदानींच्या ताब्यात, मिआल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय; मागील वर्षीपासून सुरू झाली होती खरेदी प्रक्रिया


✒️ महाराष्ट्रात 1,04,406 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,38,734 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,26,220 रुग्णांचा मृत्यू


✒️ पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज; आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट


✒️ कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत सहा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा, 16 जुलै रोजी बैठकीचं आयोजन 


✒️ भारतात 4,24,154 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,00,97,096 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,11,439 रुग्णांचा मृत्यू


✒️ महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप


✒️ साउथ सुपरस्टार विजयने इंग्लंडमधून खरेदी केली 8 कोटींची कार; पण 1 लाखांचा बसला दंड, कर चुकवणं पडलं महागात

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!