Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 21 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

साप्ताहिक सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 21 जुलै 2021

✒️ 5वी आणि 8वीच्या  वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहीती


✒️ भारताचा दुसऱ्या वन-डे सामन्यातही विजय, दीपक चहरने केल्या नाबाद 69 धावा; श्रीलंकेने 50 षटकात केल्या होत्या 9 बाद 275  धावा 


✒️ आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू: प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती 👉 https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध


✒️ जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी, मुलीवर झाडल्या गोळ्या; जखमी 

अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल


✒️ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार; शिक्षण विभाग 40 हजार जागा टप्प्याटप्प्याने भरणार, पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार 


✒️ महाराष्ट्रात 94,593 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 60,00,911 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,30,753 रुग्णांचा मृत्यू


✒️ अहमदनगर: सहकार विभागाकडे बेकायदा सावकारीच्या सात वर्षांत 544 तक्रारी; केवळ 17 गुन्हे दाखल; पतसंस्था वाढल्या तरी जिल्ह्यात बेकायदा सावकारीही जोमात


✒️ ​​​​​​​नरीमन पॉइंट येथील एक फ्लॅट 5.33 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर 


✒️ अमेरिकेचे सचिव अँटोनी ब्लिंकन 27-28 जुलै रोजी भारत भेटीवर; परराष्ट्र मंत्री जयशंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार


✒️ भारतात 4,01,236 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,03,83,001 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,18,511 रुग्णांचा मृत्यू


✒️ ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पहिली अंतराळ यात्रा यशस्वी, 3 प्रवाशांसोबत 11 मिनिटांमध्ये पूर्ण केला 105 किमी.चा प्रवास

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!