रावेर शहरात प्रमुख संवेदनशील भागात पथसंचलन...

अनामित
रावेर वार्ताहर (राजेंद्र अटकाळे )आज दि. 27 जुलै 2021 मंगळवार रोजी रावेर पोस्टे हद्दीत रावेर शहरात संवेदनशील भागात 11.30 वा. रावेर पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे व RAF चे सहा. कमांडर रवी शेक्तावात, इन्स्पेक्टर पवन कुमार, सब इन्स्पेक्टर डी. जी. पवार RAF मुंबई, तसेच RAF मुंबईचे 54 कर्मचारी, 

तसेच रावेर पोस्टेचे 32 पो. अं. आणि पोलीस मुख्यालय कडील आर. सी. पी. पथकचे 19 कर्मचारी असे पथसंचलन करिता रावेर पोस्टे येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी, पंचशील चौक, संभाजीनगर पूल, बंडू चौक, परत संभाजीनगर पूल, नागझीरी, थडा भाग, 

पाराचा गणपती, राजे छ. शिवाजी महाराज चौक, मुस्कान पानसेंटर, भोईवाडा मशीद, गांधी चौक, चौराहा, मेनरोड, परत डॉ. बाबासाहेब आंबेकर चौक मार्गे रावेर पो स्टे अशा प्रकारे सवेंदनशील भागातून पथसंचलन करून 12.51 वा.पोस्टेला आले असून रावेरकरांना कायद्याचे पालन करा,शांतता राखा असा संदेश नमूद पथसंचलनातुन दिला आहे. सदर पथसंचलन मध्ये-04 अधीकारी व 105 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!