रावेर वार्ताहर ( प्रमोद कोंडे.) रावेर मध्ये गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ तर जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात विविध संघटनेतर्फे घोषणाबाजी करून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी निंभोरा- तांदलवाडी गटातील कामांची चौकशी करण्याचे निवेदन दिपाली कोतवाल यांना संघटने मार्फत देण्यात आले.
रावेर तालुक्यातील दलितवस्ती योजनेच्या कामांच्या ई-निवेदा प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाली असून या कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा
परिषदेच्या जनरल बैठकीत जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केली होती.याचे पडसाद आज रावेरात बघायला मिळाले या प्रकरणाला आता पूर्ण राजकीय वळण लागले असून आज विविध संघटना आक्रमक होऊन संघटनांनी मोर्चा काढला यावेळी निंभोरा - तांदलवाडी गटातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली,यावेळी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरुध्द तर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ पंचायत समितीत घोषणा देण्यात आल्या.
रावेर येथील या मोर्चात बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, राजू खिरवडकर, ठेकेदार बाजीराव ठाकरे,संतोष ढिवरे, ईश्वर जाधव,लोक संघर्षचे नुरा तडवी,इरफान तडवी गणेश बारेला राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कुणाल महाले, सामाजिक विभागाचे जिल्हा कार्यध्यक्ष पंकज वाघ,चाँदखा तडवी, शरीफ तडवी,जमील तडवी, कॉग्रेस अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सावन मेढे, आदिवासी एकता परिषदचे प्रकाश भिल,आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.