रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे )रावेर तालुक्यातील पाल आश्रमात आज दि.२३ जुलै गुरुवार रोजी आयोजित कार्यक्रमात गुरु ही करुणा आणि अनुभवाची मूर्ति असते कारण मनुष्य हा कितीही दोषी किंवा नास्तिक असला ,तर त्याचा समाज काहीवेळा बहिस्कार करते परंतु संत , गुरु हे आपल्या भक्ताची चूक वेळोवेळी क्षमा करुन करुणा व उत्कृष्ठ जीवन जगण्याची आणि वेळोवेळी सावध करण्याचे अनुभव देतात.
जसे गुरुदेव परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांना ज्या वेळी गुरुदीक्षा घ्यायची होती त्यावेळी योग्य गुरु ची ओळख स्वप्नात साक्षात भगवान श्री रामदेवजी बाबा यांनी करुन दिली होती.असे गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या दिनी श्री वृंदावन धाम आश्रम पाल येथील विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी चैतन्य चॅनल च्या माध्यमातून ऑनलाईन सत्संगातुन देशभरातिल लाखो चैतन्य साधक परिवाराला संदेश दिला .
दी:- 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त मा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करुन कोरोना या महमारिचे सर्व नियम व अटीचे पालन करुन फक्त आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य बाबाजी यांच्या सह आश्रमाचे ब्रम्हचारी यांनी सकाळी 10 वाजता श्री हरिधाम मंदिर स्थित परम पूज्य सद्गुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी स्थळी पादुका पूजन करण्यात आले.त्यानंतर महाआरती व अभिषेक करुन चैतन्य चैनल च्या माध्यमातून ऑनलाईन सत्संग श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी देशभरातिल लाखो भाविकाना संबोधित केले. त्यांनतर आश्रमातील श्री:- शुभ चैतन्य जी महाराज, रामचरण चैतन्य आणि ललित चैतन्य जी महाराज यांना श्रधेय बाबाजी च्या हस्ते नैष्टिक ब्रम्हचार्याची दीक्षा प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला रावेर आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा उपस्तिथि दर्शवली.व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
