नंदुरबार जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला....

अनामित
नंदुरबार : नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पगुच्छ देवून श्रीमती खत्री यांचे स्वागत केले.  यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, बालाजी क्षिरसागर, शाहुराज मोरे, संजय बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात  आदी उपस्थित होते.
[ads id='ads1]
श्रीमती खत्री यांनी बीए, एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून त्या हरियाणातील सोनपत गावाच्या आहेत.  त्या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अपर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या पदावर काम केले आहे. मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यासंदर्भात श्रीमती खत्री यांनी विशेष उपक्रम  राबविले आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!