यावल वार्ताहर (सुरेश पाटील) असली समजून लुटलेले सोने निघाले नकली.मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक,मद्याच्या लालसेने सापडले जाळ्यात.असे वृत्त आज फक्त एका दैनिकात भुसावळ विभागात प्रसिद्ध झाल्याने संबंधित सराफ दुकानदाराची बदनामी नेमकी कोणी व कशासाठी सुरू केली?ते बेन्टेक्स सोने आहे याची खात्री आरोपींनी केली की पोलिसांनी?किंवा प्रसिद्धीमाध्यमांनी खात्री केली का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत हे पोलीस यंत्रणेला फार मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी संबंधित सराफ व्यापारी पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सुद्धा खात्रीदायक वृत्त आहे.
[ads id='ads2]
प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे की यावल येथे सराफ दुकानातून भरदिवसा पिस्तुलचा धाक दाखवून लुटलेले11लाख 26 हजार सहाशे 75 रुपये किमतीचे सोने नकली बेन्टेक्स निघाले असून लुटारूंनीही डोक्याला हात मारून घेतला आहे दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुकेश प्रकाश भालेराव रा.भुसावल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर नजीकच्या भोरटक जंगलातून ताब्यात घेतले आहे सुनील अमरसिंग मारेला हा एकमेव संशयित आता फरार आहे.
[ads id='ads1]
सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने संबंधित सराफ दुकानदारासह भुसावळ विभागातील संपूर्ण सोने-चांदीच्या दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्या सरफाची बदनामी करण्याचे मोठे षड्यंत्र कोणी कशासाठी व का?सुरू केले याबाबत तसेच ते सोने नकली बेन्टेक्स असल्याचे कोणाच्या निदर्शनास आले?संबंधित आरोपींनी ते सोने कोणत्या सोने-चांदीच्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी नेले होते का? तो व्यापारी कुठला आणि कोण?त्या व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती दिली का? पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्या फक्त एका प्रसिद्धी माध्यमांला माहिती कोणी दिली आणि कशासाठी? आरोपीला प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी भेटला का? पोलिसांनी मुद्देमाल केव्हा कुठे आणि कोणाकडून जप्त केला?आणि खरोखरच ते सोने बेन्टेक्स नकली निघाले आहे का?पोलीस खात्यातील गोपनीय माहिती ठराविक प्रसिद्धीमाध्यमांनाच मिळते का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणात मात्र यावल येथील सराफ दुकानदाराची मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्याने संबंधित दुकानदार पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची संपूर्ण भुसावळ विभागात बोलले जात आहे.

