रावेर प्रतिनिधी (राजेद्र अटकाळे)सावदा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दरवषी आषाढी एकादशी निमित्त महापूजा केली जाते ,त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सावदा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आज दि. २० जुलै मंगळवार रोजी महापुजा कै..जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे गादीपती ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आली.गांधी चौकातील सतीश महाराज जोशी यांनी पुजा पठन केले.
[ads id='ads1]
यावेळी कोरोना चे नियम पाळून शहरातील मोजके भक्तगण हजर होते.आरती झाल्यानंतर 1 क्वींटल 25 किलो साबुदाणा खिचडी चे वाटप,तसेच माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे कङून 10 कॅरेट केळीचे ,व पेढे, राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.या वेळी शहरातील बांधवांचे सहकार्य लाभले.

