रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) बदलते हवामान, प्रदूषित हवा आणि देशातील वाढती लोकसंख्या तसेच इमारतींच्या बांधकामादरम्यान कापण्यात येणारी झाडे आणि वाढते कारखाने त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच फैजाणे ग्लोबल रिलीफ फाउंडेशन (एफजीआरएफ) या शाखेतर्फे सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी हिंद 1 जुलै 2021 पासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. रावेर शहरातही आज दिनांक ११ जुलै रविवार रोजी येथील मुस्लिम कब्रिस्तान व परिसरात ठिकाणी 50 हून अधिक वृक्ष लावण्यात आले
[ads id='ads1]
संस्था तर्फे माहिती देण्यात आली आहे की मागच्या वर्ष प्रमाणे यावर्षीही संपूर्ण भारतात आमचे लक्ष्य 1 कोटी 20 लाख झाडे लावण्याचे आहे त्यांनी भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी आणि एक विशाल वृक्ष बनवावे.
[ads id='ads2]
या मोहिमेमध्ये रावेर चे पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी वृक्षारोपण करून या मोहिमेची सुरूवात केली या वेळीस योगेश सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख सैय्यद आरिफ सलीम शेख अय्यूब मेंबर असद मेंबर यांचे हस्तेही वृक्ष लावण्यात आले ही मोहीम राबविण्याबद्द कामिल आत्तरी,अनिस खान, नझर सय्यद अय्युब खान, जावेद खान,यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
