गुहागर (वार्ताहर) पुरग्रस्तांना अनेक लोक, स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, संघटना, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना यांनी मदत केली व अजूनही मदत कार्य सुरू आहे. या मदत कार्यात बिरसा फायटर्स या सामाजिक आदिवासी संघटनेने सुद्धा पाण्याचे कॅन व पाण्याचे बाॅटल चिपळूण येथे वाटप करून खारीचा वाटा उचलला आहे. मात्र त्याचा गाजावाजा कुठेच केला नाही.
हसन तडवी राज्य प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स तथा शृंगार तळी गुहागर येथील फळविक्रेते- व्यापारी यांनी आपल्या मित्रांसोबत दिनांक 23 जुलै 2021 रोजी चिपळूण येथे अतिवृष्टीत अडकलेल्या पूरग्रस्त लोकांना पिण्याचे पाण्याचे 10 -15 लीटरचे 11 कॅन व 1 लीटर बाॅटलचे 2 बाॅक्स मोफत वाटले.ही मदत वाटप करताना त्यांच्या सोबत त्यांचे बंधू मजीत तडवी व हुसन जमादार यांनी सहकार्य केले.
[ads id='ads1]
चिपळूण येथील मच्छीमार्केट, मुरादपूर,गोलकटा या भागात हे पाण्याचे कॅन व बाॅटल हसन तडवी यांनी आपल्या मित्रांसोबत वाटले.एका कारमध्ये कसे बसे शक्य त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पूरग्रस्तांना ही मदत केली. ही मदत करताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे मदतीचे फोटो काढले नाहीत, हे विशेष.कारण पिण्याचे पाणी देणे हे पुण्याचे काम आहे व ती मदत करताना फोटो किंवा विडीओ काढणे योग्य वाटत नाही. प्रत्येक मदतकार्याची प्रसिद्धीच व्हायला पाहिजे. असे काही नाही. असे बिरसा फायटर्सचे राज्य प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी यांनी यावेळी सांगितले आहे.
हसन तडवी राज्य प्रसिद्धी प्रमुख यांच्या या मदतीबद्धल पूरग्रस्तांनी आभार मानले व बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष मनोज पावरा सह सर्व बिरसा फायटर्स टिमने हसन तडवी यांच्या या कार्याचे कौतुक केलं आहे.

