देशातील महागाईच्या ‍विरोधात रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करुन तहसिलदार यांना दिले निवेदन...

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) देशातील महागाईच्या ‍विरोधात रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करुन ओ बी सी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, मुस्लीम समाजाला 5 % टक्के आरक्षण मिळाले पाहीजे, नवीन रेशन कार्ड तत्काळ मिळावे, नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे यासह विविध मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार सी जी पवार यांना दिले निवेदन केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या हुकुमशाही पध्दतीने पेट्रोल, डिझेल,एल.पी.जी.गॅस, रासायनिक खते,व इतर जिवनावश्यक वस्तुची दरवाढ या विरोधात केंद्र शासनाच्या निषेधार्थ रावेर तहसिलदार यांना निवेदन  दिनांक 12/07/2021 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालया समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करुन तहसिलदार यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

दिलेले दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,

1} खाजगी शाळेतील ऑनलाईन शिक्षण मागील व चालु वर्षेची सन 2019/2020, 2020/2021 व  सन 2021/2022 या तीन वर्षाची शैक्षणीक फि माफ करण्यात यावी.

2}सन 2021 मध्ये चक्रिवादळामुळे रावेर तालुक्यातील शेतक-याच्या केळी बागायतीचे पुर्णपणे 

नुकसान झाले त्याची तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहीजे.

3}ओ बी सी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे

4}मुस्लीम समाजाला 5 % टक्के आरक्षण मिळाले पाहीजे

5}मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागु करण्यात यावे

6}शासनाने थांबविलेल्या नोकर भरत्या सुरु करण्यात याव्या

7) नवीन रेशन कार्ड तत्काळ मिळावे, नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे

8) संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ वृद्धपकाळ या प्रकरणासाठी शासनाने लावलेल्या जाचक अटी

शिथिल करण्यात याव्या, २१००० उत्पन्नाची अट शिथिल करण्यात यावी. अशा वरील मागण्याचे निवेदन
वचित बहुजन आघाडीचे रावेर तालुक्यातील खालील सहया करणारे वचित बहुजन आघाडीचे रावेर तालुक्याच्या वतनीने देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर रावेर ता.अ. वचित बहुजन आघाडी बाळु शिरतुरे , रावेर ता.उपाध्यक्ष. वचित बहुजन आघाडी सलीमशाह यासिमशाह ,ता.उपाध्यक्ष विनोद तायडे,रावेर शहर अध्यक्ष अब्बांस, दौलत अढांगळे, अजय तायडे, शेख इम्रान शे. रमजान, बबलु, मोहम्मद शेख, कंदरसिंग बारेला, भीमसिंग बारेला, बिलासिंग बारेला,संत्रीबाई बारेला, शेवंतीबाई बारेला, गुनाबाई बारेला, रविंना बारेला, सावरीबाई बारेला उमेश सवर्णे,गौतम अटकाळे, सलमान यांच्या सह असंख्य हिला पुरुष कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!