नॅनो यूरियाचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील..

अनामित
नवी दिल्ली : देशातील नॅनो खतांच्या उत्पादनास सरकार प्रोत्साहन देत आहे. कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाने 24 फेब्रुवारी 2021 रोजी अधिसूचना क्रमांक S.O.884 (E) नुसार खत नियंत्रण आदेशात (एफसीओ) अधिसूचनेतील दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या कोणत्याही नॅनो खताचा समावेश करण्याचे अधिसूचित केले होते. 
[ads id='ads1]
तसेच  खत नियंत्रण आदेश (एफसीओ) च्या कलम 20D च्या अनुषंगाने, मेसर्स इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (इफ्को) तीन वर्षांच्या कालावधीत भारतात “नॅनो यूरिया (द्रव) खत उत्पादित करेल असे 24 फेब्रुवारी 2021 रोजीच्या S.O.885 (E) अधिसूचनेद्वारे कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाने तपशील अधिसूचित केले होते.

पारंपरिक युरियाचा असंतुलित आणि जास्त प्रमाणात वापरावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने इफ्कोने नॅनो तंत्रज्ञान आधारित नॅनो यूरिया (द्रव) खत विकसित केले आहे. पीक उत्पादन, मृदा आरोग्य आणि उत्पादनांची पौष्टिक गुणवत्ता सुधारण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे.
केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!