वसतिगृह अधीक्षक व पहारेकरी पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

अनामित
कोल्हापूर : सैनिकी मुलांचे वसतीगृह कोल्हापूर व पन्हाळा व महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने सहाय्यक वसतिगृह अधीक्षक व पहारेकरी पदे भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज 14 जुलै पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले यांनी दिली आहे.
[ads id='ads1]
ही पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा, असेही श्री. ढोले यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!