मुंबई : आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन २६/०७/२०२१ रोजी कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण करण्यात आले हा पुरस्कार २०२१ युनेस्को ने २०१५ मध्ये कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी अंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून २६ जुलै हा दिवस निवडला आणि तो दरवर्षी कांदळवनाचे विविध पैलू दाखवत साजरा केला जातो. कांदळवन परीसंस्थेचे महत्त्व ‘एक अनन्य, विशेष आणि सुरक्षित पर्यावरणीय यंत्रणा’ म्हणून प्रस्थापित करणे व त्यांचे शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि उपयोगांसाठीच्या उपायांना प्रोत्साहन देणे हे उद्दीष्ट आहे.
महाराष्ट्रात २०१२ पासून, महाराष्ट्र वन विभागाची विशेष शाखा, कांदळवन कक्ष, राज्यातील कांदळवन परीसंस्थेचे संरक्षण व संवर्धनासाठी परिश्रमपूर्वक काम करीत आहे. राज्यातील खारफुटीच्या प्रभावी संवर्धनासाठी कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान विशेषत: मुंबई व त्याच्या उपनगरांमध्ये विविध उपाययोजना राबवत आहेत. तसेच कांदळवन आणि खाडी परिसंस्थेमध्ये शास्वत उपजीविका उपक्रम राबविण्यासाठीही कार्यक्रम सुरू केले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाने महाराष्ट्रात कांदळवन व सागरी जीव संवर्धनासाठी यशस्वीरित्या विविध उपक्रम राबवणाऱ्या अधिकारी/कर्मचारी आणि इतर समुदाय सदस्यांची एक मोठी टीम तयार केली आहे. २६/०७/२०२१ अंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाचे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे अश्या निवडक कर्मचारी, बचतगट आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यासाठी “कांदळवन पुरस्कार २०२१” आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
[ads id='ads1]
हा पुरस्कार सोहळा किनारपट्टी व सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. नितीन काकोडकर, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित इतर मान्यवर श्री. सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, श्री. वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष तथा कार्यकारी संचालक कांदळवन प्रतिष्ठान, डॉ. बिवाश पांडव, संचालक, बीएनएचएस, श्री. जी. मालिकार्जून, वनसंरक्षक आणि संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, श्रीमती नीनू सोमराज, उप वनसंरक्षक, कांदळवन कक्ष तथा सह संचालक, कांदळवन प्रतिष्ठान, आणि श्री. आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक उपस्थित होते. काही निवडक आमंत्रित आणि इतर सहभागी ऑनलाइन मोडद्वारे या कार्यक्रमामध्ये सामील झाले.
कार्यक्रमादरम्यान पुढील पुरस्कार देण्यात आले (विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली):
उत्तम कार्य करणारे बचत गट:
प्रथम पुरस्कारः साई स्वामी शक्ती बचत गट, हाडी, सिंधुदुर्ग जिल्हा (रु. १,००,०००/- रोख पारितोषिक)
(जिताडा आणि काळुंद्रा मासा पिंजरा पालन उपजीविका उपक्रम यशस्वीरित्या राबविले)
द्वितीय पुरस्कारः भैरवनाथ बचत गट, तारमुंबरी, सिंधुदुर्ग जिल्हा (रु. ७५,०००/ - रोख पारितोषिक)
(या बचतगटाने शोभिवंत मत्स्य संवर्धनाचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे)
तिसरा पुरस्कारः सिमरादेवी बचत गट, धौलवल्ली, रत्नागिरी जिल्हा (रु. ५०,०००/- रोख पारितोषिक)
(या स्वयंसेवी संघटनेने शोभिवंत माशांच्या संवर्धनाचा उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत)
उपरोक्त उल्लेखनीय उपजीविका उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याव्यतिरिक्त, तिन्ही बचत गटांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे, कांदळवन व किनारपट्टीवरील पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता कार्यक्रम, महिला सदस्यांचा चांगला सहभाग, इ. कामे पार पाडली.
उत्तम कार्य करणारे प्रकल्प सहयोगी:
प्रथम पुरस्कारः श्री दीपक जाधव (प्रकल्प सहयोगी मत्स्य सिंधुदुर्ग) (रु. २५,०००/- रोख बक्षीस व पारितोषिक)
द्वितीय पुरस्कारः श्री. चिन्मय दामले (प्रकल्प सहयोगी मत्स्य रत्नागिरी) (रु. २०,००० /- रोख बक्षीस व पारितोषिक)
तृतीय पारितोषिक: कु. साईश्वरी सनगरे (प्रकल्प सहयोगी मत्स्य रायगड) (रु. १०,००० /- रोख बक्षीस व पारितोषिक)
तृतीय पुरस्कारः श्री अनिकेत शिर्के (प्रकल्प सहयोगी वने पालघर) (रु. १०,०००/- रोख बक्षीस व पारितोषिक)
सर्वोत्कृष्ट उपजीविका तज्ञ:
श्री. केदार पालव (उपजीविका तज्ञ सिंधुदुर्ग) (रु. २५,०००/- रोख पारितोषिक)
उपरोक्त प्रकल्प सहयोगी व उपजीविका तज्ञांनी आपापल्या जिल्ह्यात विविध शाश्वत उपजीविका उपक्रम / खारफुटी वनीकरण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सर्वोत्कृष्ट कार्य करणारे - वनपरिक्षेत्र अधिकारी / वनपाल / वनरक्षक पुरस्कार:
प्रथम पुरस्कारः श्रीमती चेतना शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भिवंडी (रु. २५,०००/- रोख पारितोषिक)
द्वितीय पुरस्कारः श्री. दीपक झुगरे, वनरक्षक, दादर (रु. २०,०००/- रोख रक्कम)
तिसरा पुरस्कारः श्री कुंडलिक बुरुटे, वनपाल, मुलुंड (रु. २५,०००/- रोख रक्कम)
श्रीमती चेतना शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी भिवंडी यांनी भिवंडी परिसरातील खारफुटीच्या संरक्षणाचे काम अतिशय प्रभावीपणे पार पाडले आहे. त्या व त्यांची टीम कांदळवन नष्ट करण्यात आलेल्या अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात यशस्वी झाली असून कांदळवनात अवैध प्रवेश करणारी अनेक वाहने जप्त केली. श्रीमती शिंदे यांनी या भागातील कांदळवन वृक्षारोपण कार्य आणि उपजीविका उपक्रमांची देखरेख देखील केली.
श्री. झुगारे यांनी स्थलांतरित पक्ष्यांना खायला देऊ नये म्हणून कांदळवनातील अतिक्रमणे हटविणे, कांदळवन रोपवाटिका व वृक्षारोपण कामे, मुंबई च्या समुद्र किना-यावर अडकलेल्या सागरी प्राण्यांचे व्यवस्थापन, जनजागृती यासंबंधी उपक्रमांबद्दल प्रशंसनीय काम केले आहे
श्री. बुरुटे यांनी मुंबईतील खारफुटी भागाची गस्त घालणे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील पर्यटनाशी संबंधित कामांवर देखरेखीसाठी काम करणे, खारफुटीच्या भागातील साफसफाईची कामे, कांदळवन वृक्षारोपण कामे, खारफुटी भागातील अतिक्रमणे हटविणे व त्यावरील गुन्ह्यांची नोंद या संदर्भातील स्तुत्य काम केले आहे.
विशेष उल्लेख पुरस्कार विजेते:
🔸श्री. शहबाज बामणे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, ऐरोली येथे बोट चालक आणि गाईड (१५,०००/- रोख बक्षीस)
🔸श्री. शौनक मोदी, नागरिक स्वयंसेवक आणि संचालक, कोस्टल कन्झर्वेशन फाऊंडेशन (रु. १५,०००/- रोख बक्षीस)
श्री .शहबाज बामणे हे बोट ड्रायव्हिंग, बोटींची देखभाल, केंद्रातील इतर कर्तव्ये, तसेच मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात पर्यटकांना दिसणार्या विविध स्थलांतरित पक्ष्यांची माहिती देतात. किनारपट्टी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात पर्यटकांना भरतीच्या आधारावर फ्लेमिंगो बोट सफारी वेळापत्रकदेखील तयार करतात आणि त्याशिवाय ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य सोशल मीडिया हँडल साठी फोटोही देतात.
श्री. शौनक मोदी हे मुंबईचे नागरिक आहेत आणि मरीन लाइफ ऑफ मुंबई (एम.एल.एम) या स्वयंसेवी संस्थेचे अतिशय सक्रिय सदस्य आहेत. त्यानंतर मरीन लाइफ ऑफ मुंबई चा कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशन (सीसीएफ) झाला आहे आणि आता त्याचे संचालक आहेत. या व्यतिरिक्त, श्री. मोदी हे मुंबईतील मरीन रिस्पॉन्डेन्ट ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या सागरी प्राण्यांच्या (समुद्री कासव आणि डॉल्फिन्स) स्ट्रेन्डिंग्जमध्ये उपस्थित राहणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी नेहमीच स्वेच्छेने काम केले आहे.
कांदळवन प्रतिष्ठानाने एशियन लॅब्स च्या मदतीने कांदळवन रोपवनात सामान्य जाणतेचा सहभाग वाढवण्यासाठी एक पोर्टल तयार केले आहे त्याचे उद्घाटन करणार आहेत. या पोर्टलमध्ये आपली माहिती संग्रहित करून आपण कांदळवन रोपवन लागवडीमध्ये सहभागी होऊ शकता. तसेच महाराष्ट्रातील कांदळवन ह्या लघुपटचे उदघाटन करण्यात आले.तसेच, या कार्यक्रमादरम्यान कांदळवन प्रतिष्ठान आणि बीएनएचएस यांच्यात ‘महाराष्ट्रातील पक्षीदृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ जांगांवर येणाऱ्या स्थलांतरित पाणथळ पक्ष्याची स्थिती स्पष्ट करणे’ या प्रकल्पा संदर्भात सामंजस्य करार झाला जो शासनाने मंजूर केला आहे.
या प्रकल्पांतर्गत बीएनएचएस महाराष्ट्रातील नंदूर-मधमेश्वर अभयारण्य, गंगापूर धरण, जायकवाडी पक्षी अभयारण्य, हातनूर धरण, उजैनी जलाशय व विसापूर धरण या सहा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांचा अभ्यास करेल जे स्थलांतरित पक्ष्यांच्या दृष्टीकोनातून महत्वाचॆ प्रदेश आहेत. महाराष्ट्रात येणारे स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने सेंट्रल एशियन फ्लायवे (सीएएफ) चा वापर करतात जे मध्य आशियामधून भारतीय उपखंडात येणाऱ्या पक्ष्यांसाठी मुख्य स्थलांतरित मार्ग आहेत. सीएएफ वापरून विविध स्थलांतरित पक्ष्यांना कोणते धोके आहेत हे देखील जाणता येईल आणि या अभ्यासामुळे पक्षांच्या संख्येची गती, हालचाल आणि विखुरलेल्या पद्धती समजून घेण्यात मदत होईल.
हा पंचवार्षिय प्रकल्प असेल आणि कांदळवन प्रतिष्ठान तर्फे रु. २.७७ कोटी इतका निधी बीएनएचस ला टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.