निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे) मा.ना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा अभियानांतर्गत रावेर येथे दि.27.जुलै मंगळवार रोजी सौ. कमलाबाई गर्ल्स हायस्कुल व ज्युनियर कॉलेज रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना जिल्हा जळगाव यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
[ads id='ads1]
यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्राथमिक नरेंद्र सपकाळे, शिक्षक सेना सरचिटणीस नाना पाटील, जळगाव तालुका शिक्षक सेना अध्यक्ष राजू पाटील, जळगांव जिल्हा शिक्षकसेना संपर्क प्रमुख नवलकुमार चौधरी, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलचे प्राचार्य जयंत कुलकर्णी व रावेर तालुका माध्य. शिक्षक सेना अध्यक्ष मुबारक तडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

