पाचोरा (प्रमोद कोंडे) शहरातील भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथराव शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर आप्पा पाटील आमदार चिमणराव पाटील प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे कार्यक्रमाचे आयोजक विभागीय अध्यक्ष किशोर राय साकडा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी महिला जिल्हाध्यक्षा नाजमीन शेख , रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
[ads id='ads1]
यावेळी कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टर पत्रकार पोलीस सफाई कर्मचारी याच बरोबर सामाजिक काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार व कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात अनेक नियुक्त्या ही देण्यात आल्या याच बरोबर रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जामनेर तालुक्यातील काही पत्रकारांची संघटनेचे पदाधिकारी म्हणून नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रल्हाद सोनवणे जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून भाईदास चव्हाण शहराध्यक्ष पदांची जबाबदारी राहुल इंगळे तर शहर उपाध्यक्ष म्हणून ईश्वर चौधरी यांची निवड करण्यात आली.
याच बरोबर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून भेट न झालेल्या जिल्हाभरातील संघटनेचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी सहकारी पत्रकार बांधवांची भेट झाली तर एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला एकमेकांची विचारपूस करून संबंध वृद्धिंगत केलें .यापुढे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तालुकास्तरावर हेल्मेट वाटप कार्यक्रम घेण्यासंबंधी नियोजनही केले.