रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे ) मार्गदर्शक, आधारस्तंभ, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील हे प्रत्येक शिवसैनिक व कार्यकर्त्यांसोबत मायेच्या सावलीसारखे कुटुंब प्रमुख व प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे असे म्हणणारे , आमच्यासाठी चंद्रकांत पाटील म्हणजे जशी की एक दैवशक्तीच आमच्या साथीला आहे.
त्यांनी दिलेला शब्द म्हणजे काम पूर्ण हेच त्यांचे कार्य आहे, तसेच भाऊंचा एकच शब्द संपूर्ण मनातलं भय दूर करण्यासाठी आमच्यासाठी किंवा समोरची कोणतीही व्यक्ती समस्या घेऊन गेली असेल तर ती व्यक्ती हसत हसतच येईल हा भाऊंचा शब्द असतो, हिंदुहृदयसम्राट , महानेता, सरसेनापती, वंदनीय, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचा नम्र शिपाई ते आज शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार असा प्रवास करणारा एका सामान्य कुटुंबातील आपला माणूस, सांगायचे एकच की अत्यल्प कमी शब्दात पूर्ण विषय समजेल असा,
[ads id='ads1]
शेकडो गावातील हजारो व्यक्तींना नावानिशी ओळख असलेले, आमच्या हृदयातील आपला राजा माणूस, असेच एक कट्टर, निष्ठावंत, सच्चा, शिवसैनिक, ज्याच्या माणसाच्या नसांनसात शिवसेना ,माझे सर्व काही फक्त शिवसेना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अफाट विचारांचा प्रचार प्रसार करून कित्येक कट्टर शिवसैनिक तयार केले असतील हे शब्दांत सांगता येणार नाही असे कट्टर शिवसैनिक कन्हैया गणवानी , या आपल्या माणसांवर जेव्हा गंभीर आजाराची लाट आली तेव्हा कोणताही मार्ग सुचत नव्हता, काळाच्या ओघात अडकलेला या आपल्या माणसाच्या डोळ्यांसमोर सर्व अंधार झाला, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुला पायाला गँगरीन झालेले आहे, व पैसा ही खूप लागणार व यात पाय सुध्दा जाऊ शकतो, अशा वेळी शिवसैनिकांनी हा सर्व प्रकार जेष्ठ शिवसैनिक, तसेच मा.चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मा.छोटू पाटील यांना सर्व सविस्तर विषय सांगितला तेव्हा मा.छोटू पाटील यांनी सेकंदाचाही विलंब न करता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार मा.चंद्रकांत पाटील यांना फोन करून झालेला सर्व प्रकार सांगताच भाऊंचे शब्द आणि स्वतः लक्षपूर्वक की त्यांनी स्वतः कोणत्या हॉस्पिटल ला दाखवायचे आहे यापासून ते दवाखान्यात दाखल करेपर्यंत स्वतः ते हजर होते,व कोणतीही अडचण आली तर मला सांग सर्व काही मी करेल कन्हैया तुला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही,व तुला काहीच होणार नाही मी तुझ्या सोबत आहे,
तू माझ्या घरातील सदस्य आहे, हे शब्द कानावर पडताच कन्हैया बोलले मला काहीच झालेले नाही असे वाटायला लागले, एका सामान्य कार्यकर्त्यासाठी हा माणूस एवढे करू शकतो ही कल्पना नसून हे सर्व साक्षात केलेले आहे.असा माणूस आमदार फक्त नावाला आहे पण आम्हा सामान्य कार्यकर्त्यांची एवढी मोठी काळजी घेणे हे एक कुटुंबप्रमुख म्हणून पार पाडतात,भाऊ तुमचे आभार मानायला शब्दसाठी अपुरा पडेल असे अफाट कार्य तुम्ही करीत आहात.