आरोग्य उपकेंद्र चांदसणी अंतर्गत कमळगावात न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनचा शुभारंभ...

अनामित
चोपडा प्रतिनिधी (खेमचंद धनगर)जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ.दायमा व डॉ.अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १३/०७/२१ रोजी कमळगावात लहान मुलांमधील न्युमोकोक्कल आजार व त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन या लसिचे लसिकरण मान्यवर सरपंच रोहीत साळुंखे,उपसरपंच ज्ञानेश्वर सोनवणे व समस्त पदाधिकारी ग्रामपंचायत कमळगाव यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 
[ads id='ads1]
कार्यक्रम यशस्वितेसाठी आरोग्य सहाय्यक प्रकाश पारधी,आरोग्य सेवक डॉ.महेंद्र पाटील,आरोग्य सेविका ऊज्वला परदेशी,आशासेविका संगिता धनगर,मदतनीस रत्नाबाई भालेराव,अंगणवाडी सेविका सरलाबाई साळुंखे,सोनाली धनगर,उषाबाई पाटील आदींनी परीश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!