जळगाव (वार्ताहर) येथील , कवयित्री बहिणाबाई चौधरी, विद्यापीठाच्या परीक्षा ,कोरोनाच्या पार्श्व भूमीवर , ऑन लाईन पद्धतीने परीक्षा पार पडल्या. परंतु या परीक्षेच्या गोपनीय, कामाच्या नावा खाली मक्तेदाराने पाच कोटी, तीन लाख, पंच्य्यानव हजार, रुपयाची बिले, मक्तेदारा कडून सादर करण्यात आली . शासनाच्या नियमानुसार, कोणतेही काम पुर्ण, करण्या अगोदर वर्तमापत्राद्वारे , निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात प्रसिद्ध, केली जाते. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण, केली जाते.
त्यानंतर 8ते10 दिवसांनी सबंघित अधिकारी, व निविदा भरलेल्या व्यक्ती समोर ,निविदा उघडली जाते. परंतु या सर्व नियमाची अंमलबजावणी, न करता विद्यापीठाने शासनाच्या ,नियमाची अंमलबजावणी न करता मक्तेदाराला धनादेश, अदा करण्यात आलेले आहे. त्याचं प्रमाणे, तिसऱ्या टप्प्यातील ऑन लाईन बिलाची रक्कम दोन कोटी, आठ लाख, बेचाळीस हजार रुपये, इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, पार पडल्या आहेत .वास्तविक ऑनलाईन परीक्षा पेक्षा, ऑफ लाईन परिक्षेचा खर्च, जास्त असतो .परंतु यात उलटे झाले, आहे. ऑनलाईन परिक्षेचा जास्त खर्च दाखविण्यात आला आहे .
विद्यापीठातील एक गजब प्रकार समोर ,आला आहे. गोपनीय, कामाच्या नावा खाली एकाच मक्तेदाराला, चार वर्षांपासून कामे, दिली जात आहे. या मक्तेदारा कोणाचा आशिर्वाद आहे. शोध लावला असुन, लौकरच त्यांचे नाव उघड करण्यात येईल. कोरोणाच्या काळा मध्ये, विद्यार्थी, आणि पालकांवर उपासमारीची वेळ, आली असताना त्यांची शुल्काची संपुर्ण रक्कम परत करावी. अशी मागणी प्रा संजय मोरे यांनी केली .दि. 04 जून 2021 रोजी दुपारी 1-00 वाजता. विद्यापीठामध्ये, प्रभारी कुलगुरू, प्रा.डॉ. ई. वायुनंदन यांना निवेदन, देण्यासाठी गेलो असता ते गैर हजर होते.प्रभारी, उपकुलगुरू श्री.डॉ. माहुलीकर सर हे पण कार्यालयात, उपस्थित न होते. अखेर आम्ही दुपारी, डॉ. एस. आर. भादलीकर प्रभारी कुलसचिव, यांना निवेदन दिले. विद्यापीठ परिक्षा व मूल्य मापन मंडळ संचालक श्री.बी.पी.पाटील. सर यांना भेटलो असता त्याच्याशी संबंधित, ऑन लाईन परिक्षा, खर्चा बाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी आपणास काहीच माहीती देऊ शकत नाही आपण कुलगुरुशी बोला.
असे सांगितले. वास्तविक बी.पी.पाटील. यांना या प्रकरणाची पुर्ण माहिती आहे.ते मुद्दाम मक्तेदाराला पाठीशी घालत असुन झालेल्या गैव्यवहारा मध्ये, यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाच्या झालेल्या ऑनलाईन परिक्षेच्या, भष्ट्राचाराची सखोल ,चौकशी होऊन , मक्तेदारा कडून संपुर्ण, घेतलेली रक्कम वसुल करावी. 8 दिवसात मक्तेदाराची, आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी, करण्यात यावी. असे निवेदन तसे न झाल्यास मी मा. भगतसिंह कोश्यारी ,(राज्यपाल) महा.राज्य. मुंबई. ,मा. ना. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री, उच्च, तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत, मा. ना. गुलाबराव पाटील ,जळगांव जिल्हापालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
तसेच आम्हाला पुढील आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात येईल. असे,प्रा संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, आणि सर्व शक्ती सेना, जळगाव जिल्हा, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी निवेदनाद्वारे, मा.राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे .निवेदन देताना प्रा संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष , किरण निजाई- सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, किरण वैद्य -सर्व शक्ती सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, लक्ष्मीबाई भोईर सर्व शक्ती सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पालघर, बुध्दभुषण सावळे, ,जनार्दन मेहेर, नंदकुमार चौधरी ईत्यादि उपस्थित होते.
