रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे )रावेर तालुक्यातील ताड जिन्सी येथे दि.२० जुलै मंगळवार रोजी चांदीच्या दागिन्यांना पॉलीस करुन चमकवुन देतो असे भासवुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या जवळील असलेल्या चांदीच्या दागिन्यांना केमिकलच्या पाण्यात बुडवुन घासुन त्यातुन अकरा हजार रुपयांची बावीस भार चांदी घटवून ताड- जिन्सी (ता. रावेर ) येथील तीन जणांची फसवणूक केल्या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणांनी फसवणूक केल्या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली आहे .
[ads id='ads2]
याबाबतचे वृत्त असे की करणकुमार सुबोधप्रसाद सहा. रा.एकडारा जि.भागलपुर (बिहार) व राजाकुमार प्रदीप सहा रा.प्रोफसर कॉलनी ,नौगच्छीया जि.भागलपुर (बिहार ) या दोघांनी ताड-जिन्सि येथील तीन जणांच्या घरी जाऊन चांदिचे दागिने चमकवून देतो असे सांगून शरिफ रज्जाक तडवी यांचे ४ हजार किमतीचे मालकीचे चांदीचे तोरंडे २५ भार पैकी ८ भार वजन पॉलीस करुन
[ads id='ads1]
रमजान तडवी यांचे मालकीचे साडेतीन हजार किमतीचे चांदीचे तोरडे वीस भार पैकी ५ भार व चांदीचे जोडवे ५ भार पैकी २ भार तसेच जुम्मा तडवी यांचे मालकीचे साडे तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे तोरडे २० भार वजनापैकी ७ भार असे एकुण अकरा हजार रुपये किमतीचे २२ भार च चांदीच्या दागिण्यांना चागल्या प्रकारे पॉलीस करुन चमकवुन देतो असे भासवुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या जवळील असलेल्या चांदीच्या दागिण्यांना केमिकलच्या पाण्यात बुडवुन घासुन घटवून विश्वासघात करुन फसवणुक केली . असे लक्षात येताच त्यांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना घटनेची माहिती सांगीतली पोलीसांनी तत्काळ पोलिस उमेश नरवाडे व प्रदीप सपकाळे यांना घटनास्थळी पाठविले . पोलिसांनी विश्राम जिंन्सी येथून पळून जातांना गारबर्डी गावाजवळ पकडले . पोलीस त्यांचे इतर साथीदारांचा शोध करीत आहेत .
रावेर पोलीस ठाण्यात शरीफ रज्जाक तडवी रा. ताड जिन्सी यांनी फिर्याद दिल्याने आरोपी करणकुमार सुबोधप्रसाद सहा. रा.एकडारा जि.भागलपुर (बिहार) व राजाकुमार प्रदीप सहा रा.प्रोफसर कॉलनी ,नौगच्छीया जि.भागलपुर (बिहार ) याचे वर रावेर पोलिस ठाण्यात गुरन२३८ / २०२१ भादवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ. राजेंद्र राठोड हे करीत आहेत .

