तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

अनामित
नंदुरबार :  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 7 वाजता धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 18 हजार 187 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
 पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पातून 9 हजार 724 व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातून 7 हजार 121 इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. 

 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!