निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे )रावेर तालुक्यातील सुलवाडी येथील तापी तीरावरील साकारलेल्या श्री तपलेश्वर अमरनाथ मंदिरातील त्यांच्या आश्रमात दि. २७ रोज मंगळवार सकाळी साडे आठ वाजता महावैष्णव श्री श्री १००८ एकनाथ दासजी महात्यागी तपस्वी महाराज ब्रह्मलीन झाले.त्यांचे वय ९५ होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
[ads id='ads1]
त्यांना शिष्य गणेशदासजी महाराजांनी अग्निडाग दिला..यावेळी सतपंथ संप्रदायाचे महामंडलेश्वर संत जनार्दन हरीजी महाराज , कुसुंबा येथील भरतदासजी महाराज , जिन्सी सांबर पाट आश्रमाचे परमानंद गिरीजी महाराज , पाल वृंदावन धाम आश्रमाचे गोपाल चैतन्य महाराज यांचे परिवार, विश्व वारकरी सेनेचे जिल्हाअध्यक्ष हभप संतोष महाराज वाघोडकर यांच्यासह साधुसंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.