नवापूर प्रतिनिधी (प्रकाश खैरनार) शहरातील अस्तित्व ग्रुप तर्फे महिलांसाठी आरोग्यम् धनसंपदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील सौ.भावना मिलिंद वाघ यांना सुयश मिळाले असून सदर परीक्षेसाठी अस्तित्व ग्रुपने पुस्तक तयार केले होते .या पुस्तकात दैनंदिन जीवनातील शारीरिक समस्यांवर आयुर्वेदिक घरगुती औषधे याविषयी श्रीमती निशा जयस्वाल यांनी लिहिले. जीवनातील मानसिक समस्यांना व ताणतणावांना धैर्याने कसे तोंड द्यावे याविषयी श्रीमती जयश्री पाटील यांनी तर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज विषयी श्रीमती मेघा पाटील यांनी लेखन केले.
[ads id=ads1]
सदर स्पर्धेसाठी एकूण १११ महिला नी सहभाग नोंदवला होता तर प्रत्यक्ष परीक्षेसाठी महिला ८१ महिला सहभागी होत्या .सदर स्पर्धेसाठी श्रीमती रेखा पाटील, श्रीमती उज्वला कोठावदे ,श्रीमती रागिनी शिंपी ,श्रीमती कल्पना भोकरे, श्रीमती माधुरी जयस्वाल ,श्रीमती संगीता साळुंखे यांनी नियोजन केले. तर श्रीमती सीमा पाटील, श्रीमती प्रियंका पाटील, श्रीमती प्रभा पाटील, श्रीमती कल्पना भामरे यांनी वरिष्ठ महाविद्यालय येथे स्पर्धेचे आयोजन व पर्यवेक्षण केले . स्पर्धेत वस्तुनिष्ठ प्रश्न तसेच दिर्घोत्तरी निबंध वजा प्रश्न होते. सर्व समाजातील महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. शिक्षणानंतर संसारात गुरफटल्या नंतर प्रथमच परीक्षेला सामोरे जात अत्यंत प्रेरणादायी स्पर्धा असल्याचे सहभागी भगिनींनी सांगितले. स्पर्धेच्या निमित्ताने पुस्तकाचं वाचन मनन व चिंतन झाले यामुळे निश्चितच व्यक्तिगत जीवनात फायदा होईल असेही परीक्षार्थी महिलांनी सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण श्रीमती मृदुला भांडारकर, श्रीमती मीनाक्षी सोनार, डॉ सुषमा पाटील व श्रीमती सुनंदा तांबोळी यांनी केले. तर श्रीमती विजया जडे यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती छबीताई गावीत, श्रीमती रजनी जयस्वाल, श्रीमती प्रज्ञा पवार, श्रीमती मंगला चव्हाण, श्रीमती बीनाबेन काथावाला , श्रीमती संगीता खैरनार यांनी सहकार्य केले .
[ads id='ads2]
प्रथम क्रमांक श्रीमती रुचिका शिंदे यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक श्रीमती श्वेता सोनार यांनी तृतीय क्रमांक श्रीमती भावना वाघ यांनी मिळवला . सर्व विजेत्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र देवून अस्तित्व ग्रुपच्या श्रीमती संगिता सोनार , श्रीमती सुचिता साळुंखे, श्रीमती मोना जैस्वाल ,श्रीमती अंजू सोनार यांच्या शुभहस्ते घरी जाऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. तसेच सर्व सहभागी भानिंनीना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. स्त्रियांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अस्तित्व ग्रुप नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सदस्यांनी सांगितले.