भुसावळ (प्रमोद कोंडे) भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचेे वर्दळ असून काही बेशिस्त वाहनचालक यांच्याविरुद्ध मोहीम सुरू करून मा.सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी भाग भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंंत गायकवाड शहर वाहतूक शाखा भुसावळ कडील वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचे मदतीने व आर.सी. पी.प्लाटून सह माहे जानेवारी ते जून 2021 या कालावधीत 31372 वाहन धारका विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.व 71,83,200 /- रुपये दंड आकारण्यात आलेला आहेत.तसेच 6,09,500 /- रुपये पेंडिंग दंड वसूल करण्यात आलेला आहे. जानेवारी ते जून 2021 या कालावधीत मोटर वाहन कायदा कलमान्वये 32,905 केसेस करण्यात आलेले आहेत.
रहदारीला अडथळा निर्माण करणे 250 केसेस,वाहन चालवण्याचा परवाना जवळ न बाळगणे 13,139 केसेस, ट्रिपल सेट वाहन चालवणे 1053 केसेस, फ्रंट सीट बसविणे 89 केसेस,वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे 602 केसेस, वाहनास नंबर न टाकणे फॅन्सी नंबर प्लेट 786 केसेस,विना गणवेश 1405 केसेस,विना हेल्मेट 1372 केसेस,सीट बेल्ट न लावणे 734 केसेस,इतर मोटर वाहतूक कायदा कलम अन्वये 13,475 केसेस असे एकूण सहा महिन्यात 71,83,200 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.
तरी यापुढे अवैद्य प्रवासी वाहतूक वाहन चालक बेशिस्त वाहन चालक रिक्षाचालक विना युनिफॉर्म विना लायसन्स ट्रिपल शीट मोबाईल फोनवर बोलणे रॉंग साईड वाहन चालवणे हेल्मेट परिधान करणे विना नंबर प्लेट विचित्र नंबर प्लेट वाहन अल्पवयीन मुले मुली वाहन चालवणे इत्यादी तसेच वाहतुकीस रहदारीस अडथळा निर्माण करणारे हात गाडी गाडी इत्यादी बाबत नियमांचा भंग करणारे वाहन चालकांविरुद्ध मा.श्री.डॉ.प्रवीण कुमार मुंढे पोलीस अधीक्षक जळगाव व मा.श्री चंद्रकांत गवळी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव मा.श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करून सतत मोहीम राबवण्यात येत आहे.


