उद्योजकांनी कामगारांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे- मनीषा खत्री...

अनामित
नंदुरबार -  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लॉकडाऊन काळातही उद्योग सुरू राहावेत यासाठी उद्योजकांनी कामगारांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
[ads id='ads1]
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू राहावे यादृष्टीने उद्योजकांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या, कामगारांचे लसीकरण झाल्यास कोरोना संसर्गाची तीव्रता कमी करता येते. त्यामुळे उद्योजकांनी कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे. लसीकरणासाठी औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र शिबिराचे नियोजन करण्यात येईल. लॉकडाऊन काळात कामगारांची वाहतूक सुरळीत राहील यादृष्टीनेदेखील प्रशासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. 
[ads id='ads2]
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना काळात उद्योजकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. उद्योग सुरू रहावेत यासाठी प्रशासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस नंदुरबार आणि नवापूर येथील उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!