राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना सर्व शक्ती सेनेतर्फे, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागा अंतर्गत शिष्वृत्ती मिळणे बाबत निवेदन सादर...

अनामित

जळगाव (वार्ताहर)
मा.भगत सिंग कोश्यारी (राज्यपाल)मुंबई, मा.ना.उध्दव जी ठाकरे (मुख्यमंत्री)मुंबई यांना सर्व शक्ती सेनेतर्फे, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत शिष्वृत्तीमिळणे बाबत असे निवेदन प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य ,अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या वतीने, निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासना अंतर्गत समाज कल्याण, विभागाच्या वतीने संपुर्ण, महाराष्ट्रात विविध शाखा मध्ये, लाखो विदयार्थी शिक्षण घेत आहेत.त्यामध्ये, प्रामुख्याने अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, व ईतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, समाज कल्याण, विभागा अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते. 

महाराष्ट्रातील गरीब, होतकरू,निराधार,अल्पभूधारक विदयार्थी, हे शिक्षण घेण्यासाठी विविध शहरा मध्ये, विविध भागांमध्ये भाड्याने रूम घेऊन राहतात . सर्वाना वस्तीगृहा मध्ये , प्रवेश मिळत नाही. ते विद्यार्थी रेंट ने शहरात राहतात.आणि मेस मध्ये भोजन करतात. अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजने अंतर्गत समाज कल्याण विभागा मार्फत शिष्यवृत्ती मिळते. परंतु दोन वर्ष झाले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मिळालेली नाही.तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक जाचक अटींमुळे विद्यार्थी वंचित राहत आहे . जर? एखादी विद्यार्थी एक विषयात नापास झाला . तरी त्याला ये. टी. के. टी.नुसार, पुढील वर्गात वर्षात प्रवेश मिळतो. परंतु, त्याला स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही.तसेच पंजाबराव देशमुख विभागां अंतर्गत दिली शिष्यवृत्ती याची वार्षिक उत्पन्न ,मर्यादा 8 लाख रुपये, आहे.आणि मागासवर्गीयांना विद्यार्थ्यांना मिळणारी समाज कल्याण विभागा अंतर्गत शिष्यवृत्ती योजने साठी 2,50,000 रुपये, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे .तरी ती वाढविण्यात यावी. मागील महिन्यात मी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, यांच्याशी मोबाईल वर बोललो.

 त्यांना या विषयी मी चर्चा केली.ते म्हणाले बघतो.आज पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना ,लाभ मिळउन दिला नाही. कोट्यावधी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वापरला जातो . शासणाकडे करोडो रुपये, राखीव असताना विद्यार्थ्यांना 2 वर्षा पासुन त्याचा लाभ मिळालेला नाही. 

विद्यार्थ्याची शासनामार्फत पिळवणूक होत आहे. कोरोना मुळे संपुर्ण ,महाराष्ट्रात हाहाकार माजविला असुन रोजगार ,पुर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी आपण विरोधी पक्ष नेते आहात आपण व महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन संपुर्ण महाराष्ट्रात समाज कल्यान विभागांतर्गत डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळउन द्यावा . 

पुढील 8 दिवसात विद्यार्थ्यांना ,लाभ न मिळाल्यास संपुर्ण, महाराष्ट्राभर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आदोलन छेडण्यात येईल. अशी मागणी प्रा. संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष आणि राष्ट्रीय मानव अधिकार, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष,आणि सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी मा. भगत सिंग कोश्यारी (राज्यपाल ), मा.ना. उध्दव जी ठाकरे (मुख्यमंत्री) मुंबई , सामाजिक आणि न्याय मंत्री- धनंजय जी मुंडे यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे. निवेदन देताना प्रा.संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष, किरण निजाई सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, किरण वैद्य सर्व शक्ती सेना पालघर जिल्हा अध्यक्ष,लक्ष्मीबाई भोईर सर्व शक्ती सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पालघर, बुध्दभुषण सावळे, ,जनार्दन मेहेर, नंदकुमार चौधरी ईत्यादि उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!