भाटपुरे (वार्ताहार) गावात 1/08/2021 रोजी गावात सामाजिक बांधिलकी जपुन कोरोना योध्दा आणि 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.तसेच यशस्वी झालेले अभियंता श्री दिनेश जाधव यांनी युवकांना मार्गदर्शन केले.कोरोना योध्दा नी आपले मनोगत व्यक्त केले.
[ads id='ads1]
या प्रसंगी गावाचे सरपंच श्रावण चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावांसाठी कोरोना योध्दा आणि युवकांचे महत्व सांगितले.10 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी जीवनामध्ये यश अपयशाच्या पायऱ्या चढत असताना आला तर खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करावे असे संबोधित केले.
भविष्यामध्ये संधीचे माहिती या मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी संरपंच श्रावण चव्हाण,ए. एन. हिना गावित, आशा वर्कर परावर्तीका भारती पाटील, न्हावी ताई, शोभा माळी, प्रतिभा करण करंकाळ, मधु जाधव, दिनेश जाधव, मयुर पाटील युवा सेना विभाग अधिकारी, उमेश राठोड युवा अधिकारी युवा सेना, उमेश राठोड शाखा अधिकारी, कमलेश जाधव, बंटी राठोड,10 वी चेतन राठोड, तुषार राठोड,गोलु राठोड, श्याम गोसावी, राहुल राठोड,भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अध्यक्ष धुळे जितेंद्र राठोड
