मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला रुपये 7 लाख 25 हजार 600 चा मुद्देमाल

अनामित
अलिबाग,जि.रायगड - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप अधीक्षक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी गोठणवाडी,कोकबन,ता. रोहा येथे व रोहा कोलाड बायपास रोड, थिम पार्क गार्डन जवळ,भाजी मार्केटच्या समोर, रोहा, जि.रायगड येथे श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभाग, श्री.रमेश एम.चाटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खालापूर सुधागड विभाग, श्री.अंकुश बी. बुरकुल, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,रोहा मुरुड विभाग, श्रीमती आर. व्ही.नरहरी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, महिला जवान श्रीमती.अपर्णा सी.पोकळे,
जवान श्री.निमेष एस.नाईक आणि श्री.गणेश के.घुगे या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चार चाकी एर्टिका
MH 05 CA 3044 सह 129.6 बल्क लिटर (एक बॉक्स मद्य = 8.64 बल्क लिटर) विदेशी मद्य जप्त करून एकूण तीन आरोपींना अटक केली.
[ads id=ads1]
गोठणवाडी येथे एक आरोपी व विदेशी मद्य- रूपये 40 हजार 800, रोहा येथे दोन आरोपी व एक वाहन- किंमत रूपये 5 लाख 72 हजार आणि बनावट विदेशी मद्य रुपये 1 लाख 12 हजार 800, अशा प्रकारे एकूण रुपये 7 लाख 25 हजार 600 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभाग यांनी दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!