जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत दि.9 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन

अनामित
पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि. पालघर यांच्याव्दारे 9 ऑगस्ट 2021 पासून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर गौरव सप्ताह दि. 9 ऑगस्ट 2021 ते दि.15 ऑगस्ट 2021 या कालावधीत राबविण्यात येत असून यादरम्यान खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
[ads id='ads1]
1. दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी शालेय विद्यार्थ्यांची नृत्य स्पर्धा कोविड-19 बाबतचे सर्व नियमांचे पालन करून सदर स्पर्धा प्रकल्प कार्यालय डहाणूच्या कार्यक्षेत्रातील तलासरी, डहाणू, पालघर व वसई या तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

2. के. एल. पोंदा हायस्कुल, डहाणू येथे आदिवासी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री (सदरचे प्रदर्शन दि. 9 ऑगस्ट ते दि. 13 ऑगस्ट पर्यंत स. 11 ते सांय 4 वाजेपर्यंत असेल)
3. दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी डहाणू येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन समारंभ व त्यानंतर के.एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे आदिवासी कलाकारांची नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

 त्यानंतर नृत्य स्पर्धेमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ, तसेच 10 वी व 12 वी तील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या अनुषंगाने सदर सप्ताहामध्ये कातकरी मुलींना सायकल वाटप, NEET / JEE सेंटर उद्घाटन, कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान, वनपट्टे धारकांचे वनहक्क दावे वाटप यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

5 ते 13 ऑगस्ट कालावलीधील बचतगट प्रदर्शनास नागरिकांनी कोविडचे नियम पाळून भेटी द्याव्यात व सहभागी बचत गटांच्या उत्पादन व विक्रीस प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रकल्प कार्यालयाव्दारे करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहितीसाठी हर्षद चौधरी 8237765343 व रोहित पाटील 9860966865 यांना संपर्क साधवा. असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणु यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!