Jalgaon : जिल्ह्यातील २६ प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

राहुल डी गाढे(सुवर्ण दिप वृत्तसेवाराज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकतेच झाले आहे जिल्ह्यातील २६ विविध पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत.


कोणाची कुठे बदली ? वाचा खालील प्रमाणे

>शनिपेठचे प्रभारी असणारे निरिक्षक विठ्ठल ससे यांची पोलीस निरिक्षक सुरक्षा शाखा प्रभारी येथे बदली झाली आहे.


>भुसावळ शहरचे निरिक्षक बाळासाहेब बाजीराव ठोंबे यांची जिविशा शाखा जळगाव प्रभारी येथे बदली करण्यात आली आहे.


>भुसावळ तालुका पोलीस स्थानकातील रामकृष्ण महादू कुंभार यांची जळगाव तालुका स्थानकात प्रभारी निरिक्षकपदी बदली झाली आहे.


>रावेर पोलीस स्थानकाचे रामदास वाकोडे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात निरिक्षकपदी बदली झाली आहे.


> चाळीसगावचे प्रभारी विजयकुमार नरसिंहराव ठाकूरवाड यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.


>जामनेरचे प्रताप विश्‍वनाथ इंगळे यांची भुसावळ शहर पोलीस स्थानकात निरिक्षकपदी ट्रान्सफर झाली आहे.


>शहर वाहतूक शाखेचे देविदास मधुकर कुनगर यांची चोपडा ग्रामीण येथे बदली झाली आहे.


> पोलीस नियंत्रण कक्षातील किरण बाजीराव शिंदे यांची जामनेर स्थानकात बदली झाली आहे.


>बुलढाणा येथील कैलास नागरे यांची रावेर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.


>बीडीडीएस नाशिक शहर येथील विजय फकीरराव शिंदे यांची रामानंदनगरला बदली झाली आहे.


> वाशीम येथील शंकर विठ्ठल शेळके यांची धरणगाव पोलीस स्थानकात बदली झाली आहे.


> नाशिक ग्रामीण येथील कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे.


>धरणगाव येथील अंबादास शांताराम मोरे यांची जळगाव येथील मानव संसाधन शाखेत बदली झाली.


>जिल्हापेठचे विलास वसंत शेंडे यांच्याकडे आता भुसावळ तालुक्याचा प्रभार असणार आहे.


> सुरक्षा शाखेतील दिलीपसिंह मांगो पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.


>नियंत्रण कक्षातील लिलाधर नारायण कानडे यांच्याकडे आता जळगाव शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आली आहे.


>सायबर पोलीस स्थानकाचे बळीराम हिरे यांची शनिपेठला बदली झालेली आहे.


> संतोष नारायण भंडारे यांच्याकडे आता पारोळा स्थानकाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.


>मानव संसाधन विभागातील अरूण काशिनाथ धडवडे यांच्याकडे पहूर स्थानकाची जबाबदारी आली आहे.


>भुसावळ बाजारपेठचे सपोनि अनिल छबू मोरे यांच्याकडे नशिराबादची जबाबदारी आली आहे.


>एलसीबीचे सपोनि सिध्देश्‍वर हेमंत आखेगावकर यांच्याकडे फैजपूर स्थानकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

>पिंपळगाव हरेश्‍वरच्या सपोनि निता कायटे यांच्याकडे कासोदा पोलीस स्थानकाची जबाबदारी आली आहे.


> बाजारपेठचे सपोनि कृष्णा भोये यांना पिंपळगाव हरेश्‍वरची जबाबदारी मिळाली आहे.


> एमआयडीसीतील सपोनि जयेश खलाणे यांना मारवड स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.


>पहूरचे सपोनि स्वप्नील नाईक यांच्याकडे भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी असेल.


> नाशिक येथून येणारे आशिषकुमार आडसूळ यांच्याकडे वरणगावची जबाबदारी मिळाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!