शिंदखेड येथील जय श्रीकृष्ण महिला ग्रामसंघाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 शिंदखेड ता.रावेर प्रतिनिधी ( विनोद तायडे)

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला येत्या 15ऑगस्ट ला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने याच पार्श्वभूमीवर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे.त्या निमित्ताने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करून  साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन  माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी  दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी उमेद अभियानातील महिला स्वयंसहाय्यता समूह,ग्रामसंघ,प्रभाग संघाच्या महिलांशी ऑनलाइन संवाद साधला.

शिंदखेड येथील जय श्रीकृष्ण महिला ग्रामसंघाच्या वतीने  आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

त्या  कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शिंदखेड ता.रावेर येथील जय श्रीकृष्ण महिला ग्रामसंघ यांनी केले होते. या कार्यक्रमास ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा अरुण पाटील,सचिव सौ.कविता पाटील,कोषाध्यक्ष सौ प्रतिभा पाटील,CRP सौ.रुचिता महाजन,बँक सखी जयश्री पाटील,अंगणवाडी सेविका श्रीमती मिनाक्षी चौधरी,अंगणवाडी मदतनीस सौ.उत्कर्षा पाटील,आशा वर्कर सौ.ज्योति पाटील तसेच उमेद अभियानाच्या सर्व महिला उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!