यंदा १५ ऑगस्टला ग्रामसभा होणार का ? जाणून घ्या काय ठरलं...

अनामित
कळवण वार्ताहर (सुशिल कुवर) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार १५ ऑगस्टला ग्रामसभा आयोजित केली जाते. पण येत्या १५ ऑगस्ट (स्वतंत्र दिनी) रोजी ग्राम पंचायती मार्फत होणारी ग्रामसभा होईल का? याबाबत अद्यापही साशंकता आहे.
[ads id='ads1]
दरम्यान दरवर्षी १५ ऑगस्टच्या निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत असते. परंतु गेल्या वर्षी कोरोनाचा काळ असल्याने ग्रामसभा स्थगित करण्यात आल्या होत्या.यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्याबाबत विचार विनिमय चालू आहे.

तत्पूर्वी ही ग्रामसभा घेण्याबाबात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा, असे राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव मंगेश मोहिते यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!