निंभोरा बु वार्ताहर (प्रमोद कोंडे) निंभोरा बु. येथील वडगांव रस्त्यावरील शिवारात अज्ञात इसमाने शेतक-यांच्या केळीचे घड व काही शेतकऱ्यांचे कापसाचे पीक कापून नुकसान करण्याचे काम अज्ञात इसमाकडून गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे अशा विकृत समाजकंटकाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
[ads id='ads1]
सविस्तर वृत्त असे की,
निंभोरा येथील वडगांव रस्त्याला लागून असलेल्या राकेश जनार्दन ब-हाटे यांच्या केळी बागेत चार दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने पन्नास एक घड कापून फेकले होते. त्याची लेखी तक्रार ब-हाटे यांनी निंभोरा पोलिसांत दिली. त्याची चौकशी व पंचनामा निंभोरा पोलिसांतर्फे सहाय्यक फौजदार रा. का. पाटील व पो.हे.कॉ. विकास कोल्हे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केला.त्यानंतर दररोज एकेक करीत सुरेश रघुनाथ चौधरी, हर्षल भिरुड, हेमंत पंढरीनाथ ब-हाटे यांच्या शेतातील प्रत्येकी १००ते १५० झाड, कापसाचे पीक काही ठिकाणी कापून नुकसान करण्यात आल्याने शेतक-यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.केळीचे वाढलेले बाजारभाव पाहता अशा वैमनस्क व विकृत व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी बांधवांतून होत असून चाऱ्याची व पिकांची चोरी वडगांव शिवारात नित्याची झाली असून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत आम्ही प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असून तक्रारीची दखल घेत संशयितांचा शोध घेऊ.आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने सदर प्रकार होत आहे.
श्री. विकास कोल्हे
पोलिस हेडकॉन्स्टेबल ,निंभोरा पोलीस स्टेशन.
