यावल वार्ताहर (सुरेश पाटील) शिवसेनेचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक, विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या स्वतःच्या गावात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलयुक्त रस्ता होत असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे मुश्किल होत असते,
[ads id='ads1]
यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा अॅड.देवकांत पाटील यांनी विरावली ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना लेखी निवेदन देऊन वार्ड क्रमांक 3 मध्ये तात्काळ रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याबाबत तक्रार करण्यात आल्याने जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी आणि चोपडा विधानसभा मतदार संघातील माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे(आमदार सौ. लताताई सोनवणे)यांच्याशी थेट संपर्कात राहणाऱ्या लोकप्रतिनिधीच्याच गावात दिव्याखाली अंधार असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दि.25/8/2021 रोजी विरावली गावातील सरपंच यांचे नावाने,ग्रामसेवक विरावली तालुका यावल जिल्हा जळगाव यांना विरावली गावात वार्ड क्र.3 खालचे गाव रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले या आशयाचे निवेदन अर्जदार ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अॅड.देवकांत बाजीराव पाटील,शोभा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य शकुंतला विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य हमीदा टेनु तडवी,यांच्या वतीने देण्यात आले वरील निवेदनानुसार विरावली गावात खालचे गाव बस स्थानकापासून ते नजीर तडवी यांच्या घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पायी चालणे कठीण होऊन जाते लहान मुले म्हातारी माणसे यांना पडण्याची भीती निर्माण होते तसेच हा रस्ता पावसाळ्यात चालणे योग्य राहत नाही म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे अशी मागणी विरावली ग्रामस्थांनी केली आहे म्हणून आपण प्राध्यान्य क्रमाने15व्या वित्त आयोगातून या रस्त्याची मागणी लवकरात लवकर मान्य करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले तरी सरपंच ग्रामसेवक व संबंधित अधिकारी रस्ता बांधकाम करण्यासाठी तात्काळ काय कार्यवाही करतात याकडे विरावली ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.