तांदलवाडी परिसरातील शेतकरी चोरांमुळे हैराण आता केबल ऐवजी विद्युत पंप फोडून तांब्याच्या तारांची चोरी...

अनामित
रावेर (वार्ताहर) प्रमोद कोंडे रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरात कृषी पंपाच्या चोऱ्यांचे प्रमाण काही बंद होतांना दिसत नाही. गुरूवारी दि. १२ च्या रात्री चोरट्यांनी मांगलवाडी येथील तापी नदीकाठावरील गट नं १४१ येथील बॅकवॉटर जवळील कृषी विद्युत पंप फोडून त्यातील तांब्याच्या तार चोरून नेल्यात.
[ads id='ads1]
या आधी २ जुलैच्या मध्यरात्री ६ ते ७ शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीस गेल्या होत्या महीन्याभरानंतर पुन्हा चोरांनी डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून जणू काही चोरटयांनी पुन्हा पोलिस प्रशासनास आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत आहे.चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा मोठा मनस्ताप वाढला आहे व शेतकरी हैराण झाले आहेत.
गुरूवारी दि १२च्या रात्री चोरटयांनी मांगलवाडी येथील उत्तम हिवराळे,सुरेश हिवराळे,बाळकृष्ण हिवराळे यांचे प्रत्येकी दोन विद्युत पंप तर विशोर हिवराळे, वेडू हिवराळे व विजय हिवराळे यांच्या एक विद्युत पंप फोडून त्यातून तांब्याच्या तार काढून चोरून नेल्यात. गेल्या काही महिन्यांपासून सतत केबल वायर चोरीला जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता कॉपर वायर केबल ऐवजी अॅल्युमिनीअम वायरच्या केबल वापरण्यास सुरूवात केली आहे.

यामुळे चोरांच्या हाती काही लागत नसल्याने चोरांनी या केबल चोरून नेण्याऐवजी आता विद्युत पंप फोडून तांब्याच्या तार काढुन नेण्याकडे आपला मोर्चा वळविलेला दिसून येत आहे.शेतकरी विशोर हिवराळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध निंभोरा पो स्टे ला गुन्हा दाखल झाला आहे.

पो.स्टे. ला खबर मिळताच निंभोरा पो. स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी येऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी हरीभाऊ हिवराळे, राजाराम चौधरी, भागवत कांडेले, ज्ञानेश्वर हिवराळे,वेडू हिवराळे,सुरेश हिवराळे आदी उपस्थित होते.पुन्हा चोऱ्या सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी मोठे धास्तावलेले असून पूर्णपणे हतबल झालेले आहेत. या चोऱ्या थांबणार कधी असा प्रश्नही प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!