रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर तालुक्यातील पाल येथे रात्री घरात झोपेलेले असताना कोबरा जातीचा साप चावल्याने तीन वर्षीय बालिकेचा करूण अंत झाल्याची घटना आज दिनांक १ ऑगस्ट रविवार रोजी पहाटेच्या सुमारास पाल येथे घडली. मागील काही महिन्यात अशा प्रकारची एकाच परिसरातील ही चौथी घटना असल्याचे बोलले जात आहे.
[ads id='ads1]
सातपुडा पायथ्याशी जंगल परिसरात पाल हे ठिकाण आहे. येथील वस्ती कमी आहे. मात्र जंगल परिसर असल्याने या भागात जंगली हिंस्त्र प्राणी, साप नेहमी फिरत असतात. अशात पहाटे परिवारासोबत झोपलेल्या चिमुकलीला कोबरा जातीच्या सापाने दंश केला. यात तिचा मृत्यू झाला. भावना गणेश जाधव (वय ३) असे या बालिकेचे नाव आहे.
आजीच्या मांडीवरच सोडले प्राण
पहाटेच्या सुमरास झोपेतच कोबरा जातीच्या सर्पाने भावना हिच्या हाताच्या बोटाला दंश केला. काहीतरी चावल्याचे तिला जाणवले असताना तिला जाग आली. रडायला लागल्याने परिवाराला देखील जाग आली. यानंतर परिवाराच्या लक्षात आल्याने तिला जवळ घेतले. आजीने तिला मांडली घेतले असता सर्प दंश झाल्यांतर काही मिनिटातच बालिकेने आजीच्या माडींवर प्राण सोडले. रात्री तीनच्या सुमारास घटना घडली असून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.