निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे) समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाने स्थान, व लोककलेतुन केले त्यांनी जनमनाचे पुनरनिर्माण असे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंभोरा बु. ता. रावेर येथील ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा व मनात स्मृती राहील असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्टेशन बेघर एरियात घेतला.दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नातून वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे.
[ads id='ads1]
वृक्षापासुन आपल्याला ऑक्सिजन भेटून, रखरखत्या सूर्यापासून आसरा, व वृक्ष जमिनीची धूप ही रोखतात.वृक्षारोपण काळाची गरज आहे.वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला.
या कार्यक्रमास निंभोरा गावाचे सरपंच सचिन महाले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिंदकेशरी चंद्रभान रामचंद्र सूर्यवंशी, संजय महाजन, रविंद्र ठाकरे, शांताराम पाटील, ईश्वर कोळी,तेजराव सोनवणे, दुर्गेश कोळी, यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.