रावेर पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव मा.डॉ.प्रविण मुंढे यांच्या हस्ते सौ.कल्पना पाटील यांचा सत्कार

अनामित
रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) रावेर येथे मा.जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे जळगांव यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या सभेचे रावेर पोलीस स्टेशनमध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
[ads id='ads1]
या सत्कार कार्यक्रमात ग.स.सोसायटीच्या संचालिका, व महिला दक्षता समितीच्या सदस्या,आदर्श शिक्षिका, सौ. कल्पना दिलीप पाटील यांचा ही यांनी कोरोना काळात राबविलेल्या ई बुक 1 ते 5 या उपक्रमाबद्दल मा.प्रविण मुंढे साहेबांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, यांच्या हस्ते ही सौ. कल्पना दिलीप पाटील यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमांस रावेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे , पोलीस उपअधिक्षक, विवेक लवांड ,रावेर पोलीस स्टेशनचे पी.आय.रामदास वाकोडे, स. पो. नि. शीतलकुमार नाईक, मनोजकुमार वाघमारे, अनिस शेख,तसेच तालुक्यातील व शहरातील राजकिय, सामाजिक, अशा विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर,महिला समिती सदस्या, शांतता समिती सदस्य,यात डॉ. सुरेश पाटील,डॉ. दत्तप्रसाद दलाल, डॉ. संदीप पाटील,पद्माकर महाजन, अयुब पहिलवान, दिलीप कांबळे, सादिक शेख, अशोक शिंदे, पंकज वाघ,आसिफ मोहम्मद, सावन मेढे, प्रदीप सपकाळे, योगेश पाटील, महेश लोखंडे, शेख गयास, महेमूद शेख,संतोष पाटील, घुमा तायडे, कांता बोरा, कल्पना पाटील, शारदा चौधरी, भाग्यश्री पाठक, सुवर्णा भागवत,सुनीता डेरेकर,तसेच हिंदू सेवा संघटना, व मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी सर्व पोलीस स्टाफ व पत्रकार बंधू उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!