रावेर तालुक्यातील निरुळ येथे कृषिकन्येकडून आधुनिक शेतीवर मार्गदर्शन.....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

      रावेर तालुक्यातील निरुळ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय ,नाशिक यांची कृषिकन्या कु. नम्रता प्रकाश महाले,हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकतऱ्यांना आधुनिक शेतीवर मार्गदर्शन केले. [ads id="ads1"]  

       निरुळ येथील शेतकऱ्यांना थेट शेतात व गावात जाऊन प्रात्याक्षिकाव्दारे आधुनिक पद्धतीची पीक लागवड, खत-पाणी व्यवस्थापन,चारा प्रक्रिया, बीज प्रक्रिया, माती परीक्षण, कीटकनाशकांची माहिती व काळजी पूर्वक हाताळणी या विषयी माहिती व प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. पिकांवर येणाऱ्या रोगांची माहिती आपण विविध ॲपव्दारे कशी घेऊ शकतो,पिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनाची खरेदी विक्री ॲप व्दारे कशी करू शकतो या बद्दल शेतकऱ्यानमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. [ads id="ads2"]  

      या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्येव्दारे शेतकऱ्यानंसाठी कृषी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला.त्यासाठी प्राचार्य. डॉ. आय. बी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा.श्वेता सातपुते,प्रा. डॉ. दिपक शिंदे,प्रा.डॉ.विशाल गमे,प्रा. डॉ. सूर्यवंशी, प्रा.योगेश भगुरे, प्रा. सूर्यवंशी,प्रा.अमोल कानडे,प्रा.देसले,प्रा. नयन गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!