वडगांव येथे चोरी गेलेल्या हळदीच्या गोण्या वाहनासह २४ तासात जप्त; रावेर पोलीसांची मोठी कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) Raver तालुक्यातील केऱ्हाळे येथील हळदीच्या गोण्याची चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचे वाहन  दिनांक ३ ऑगस्ट मंगळवार रोजी शोधून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अद्याप संशयित आरोपी हा फरार आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


       सविस्तर माहिती अशी की, Raver तालुक्यातील केऱ्हाळे येथील आरोपी यांनी वडगाव शिवरातून  हळकुंड (हळद) चे ५९ हजार ४०० रूपये किंमतीचे ११ गोण्या, २१ हजार रूपये किंमतीचे ठिबक नळ्या आणि ७ हजार रूपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरची चोरी गेल्या उघडकीला आले होते. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चोरलेले हळदीच्या गोण्या रावेर पोलीसांनी (एमएच १९ एस ६९४४) क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यात ११ गोण्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई Raver पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज वाघमारे, पोना निलेश चौधरी, महेंद्र सुरवाडे, पो.कॉ. सुरेश मेढे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, सुरेश तडवी, महेश मोगरे यांनी कारवाई केली. मुद्देमालाची चोरी करणारा संशयित आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा शोध घेत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!