नागपूर - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील विश्वासामुळे व सर्व घटकांना न्याय देण्याचा भूमीकेतून वंचित बहुजन आघाडीत नरखेड तालुक्यातील जलालखेडा या गावी सौरभ डोंगरे, मेहबूब बानवा, प्रितम निकोसे, निकेश वानखडे, प्रफुल निकोसे, शुभम डबरासे, कुणाल निकोसे, प्रितम वानखडे, शुभम निकोसे, हर्षल ढोकणे, योगेश सटवे, गौरव निकोसे, अनिल वानखडे, सागर सावरकर, राजेश डोंगरे, हार्दिक निकोसे, ऋषिकेश सनेश्वर, क्षितिज निकोसे यासह अनेक मान्यवरांनी नागपूर जिल्हाध्यक्ष - विलासजी वाटकर, जिल्हा प्रवक्ता - सुमेध गोंडाने, शहर प्रवक्ता - अंकुश मोहिले, तुषार रंगारी, श्रीकांत गौरखेडे, सुमधु गेडाम, प्रफुल्ल सोमकुंवर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचा सन्मान व प्रवेश जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचा वतीने जिल्हाध्यक्ष विलासजी वाटकर साहेब यांनी केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
[ads id='ads1]
यावेळी जिल्हा प्रवक्ता सुमेध गोंडाने यांनी, जाती-धर्माच्या भिंती तोडत एकत्रित आलेल्या मान्यवरांना संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्यातील 'डवलामेटी' (आठवा मैल) पॅटर्न पूर्ण नरखेड तालुक्यात राबविणार असुन खऱ्या अर्थाने जलालखेडा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्य सर्वसमावेशक व शेवटच्या घटकाला न्याय देणारे असल्याचे सांगुन स्थानिक कार्यकर्त्यांच्या कार्याप्रति अभिमान व्यक्त केला तसेच स्थानिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती, छोटे उद्योग व आरोग्य विषयक प्रश्ण सोडवणुकीसाठी संकल्प या ठिकाणी करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जलालखेडा येथील सौरभ डोंगरे, प्रितम निकोसे, निकेश वानखडे, प्रफुल निकोसे, शुभम डबरासे, कुणाल निकोसे, प्रितम वानखडे, शुभम निकोसे इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन तुषार रंगारी यांनी केले.
