रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) शहरातील एका सोन्याच्या दुकानात २ अनोळखी महिला खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात आल्या मात्र, दुकानदाराला फसवत १ लाख ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना आज दि. १० ऑगस्ट मंगळवार रोजी शहरात उघडकीस आली आहे.
[ads id='ads1]
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातील हेडगेवार चौकात असलेल्या श्री महालक्ष्मी अलंकार या ज्वेलर्स दुकानात ग्राहक बनून २ अनोळखी महिला काल दि. ९ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आल्या त्यांनी दागिने पसंत करण्याच्या बहाण्याने १,५०,००० रूपये किंमातीचे (काळे मणी लावलेले व त्यावर हालमार्कचे चिन्ह SMA 916 असलेले) ३८.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुकानदाराला फसवून चोरी केली. मात्र ही बाबत मालक दुकान बंद करताना स्टॉक चेक करीत असताना सोन्याचे मंगळसूत्र कमी असल्याचे लक्षात आल्यान CCTV फुटेज चेक केले असता त्या २ महिलांनी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा यांचा विश्वास संपादन करून हात चलाखीने त्यांचा विश्वासघात घेत सोन्याची पोत पाहत असताना एक पोत चोरून नेल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात २ अनोळखी महिलांच्या विरोधात आज दिनांक १० ऑगस्ट मंगळवार रोजी सराफ दुकानदार नरेंद्र सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरू रावेर पोलीस ठाण्यात गु र नं २७७ / २०२१ भा द वि कलम-406,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि शितलकुमार नाईक करीत आहेत .

