नागपूर - स्पर्धा परिक्षेव्दारे उत्तम प्रशासकीय अधिकारी प्रशासनात येतात.स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी वर्तमानपत्र,मासीके ,संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दयावे व विदयार्थ्यानीही ई-लायब्ररीव्दारे संदर्भ साहित्य अभ्यासण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज व्यक्त केले.
[ads id='ads1]
कामठी नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भुमीपूजन तसेच लोकार्पण त्यांनी आज केले.त्यातील प्रभाग क्रमांक 16 येथील छत्रपती नगरातील ई –लायब्ररी तसेच स्टडी रूमचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी कामठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शाहजहॉ हाजी शफाअत अहमद,उपाध्यक्ष अहफाज अहमद व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.सोशल मिडीयाच्या काळात अनेक विषयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.मात्र स्पर्धापरिक्षांसाठी सखोल वाचन गरजेचे आहे.
त्यासाठी ही ई –लायब्ररी तसेच स्टडी रूम उपयुक्त ठरणार आहे. ईमलबाग मैदानाचे सौदर्यीकरण कार्यकम,प्रभाग क्रमांक 10 शुक्रवारी बाजार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच स्टेजचे बांधकाम व सौदर्यीकरण, कामठी शहरासाठी विस्तारीत वाढीव पाणी पुरवठा तीन टाकी बांधकामाचे भूमीपूजन ,ईदगाह मैदान सौंदर्यीकरणाचे लोकार्पण,प्रभाग क्रमांक 15 मधील सुरक्षा भिंत बांधकामाचे लोकार्पण तसेच अग्नीशमन वाहनाचे सुध्दा आज पालकमंत्री डॉ.राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. 27 कोटी 92 लक्ष 41 हजार रूपये निधीच्या विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण आज करण्यात आले.