अवैद्य गुरांची वाहतूक करणार्या ट्रकवर RTO ची बेधडक कार्यवाही ; जळगाव येथील बाफना गो शाळेत गुरांची रवानगी..

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर चोरवड येथील प्रादेशिक सीमा तपासणी नाक्यावर येथील सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या कर्तव्य दक्षतेने मध्य प्रदेशातून महाराष्टात येत असलेला कत्तलीच्या बहाण्याने जात असलेला अवैद्ध गुरांच ट्रक पकडून रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना आज दि.8 रविवार रोजी दुपारी2वाजता घडली.
[ads id='ads1]
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर रावेर तालुक्यातील चोरवड. सीमा तपासणी नाक्यावर आज दुपारी2वाजेच्या सुमारास सहरणपुर(उत्तरप्रदेश)येथून अवैध गुरांची वाहतूक करणा ट्रक क्रमांक युपी11एटी1469 चोरवड.सीमा तपासणी नाक्यावर आला असता येथील कर्त्याव्यावर असलेले अधिकारी यांना संशय आल्याने सदर ट्रकची झडती घेतली त्यात अमानुष पणे.बैल गायींना हातपाय बांधून निर्दयपणे कोबून वरती जाड ताडपत्री बांधून ठेवलेली आढळली लागलीच त्यांनी रावेर पोलिस स्टेशमध्ये संपर्क साधून रावेर पोलिस उप निरीक्षक शीतल कुमार नाईक दीपक मेढे,योगेश चौधरी सह घटना स्थळ गाठून ट्रक व चालक राजू शेख यास ताब्यात घेतले असता संबंधित चालकाने सांगितले मी बदली चालक म्हणून आलो आहे पण खरा ड्रायव्हर पळून गेला आहे.सदर गुरे बेंगलोर येते जात असल्याचे सांगितले. 

सीमा तपासणी नाक्यावरील कर्तव्यावर असलेले आरटीओ श्रीकांत महाजन याच्याशी चर्चा करून पोलिस निरीक्षक रामदास वाकोदे यांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सबंधित ट्रक पो. उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक यांनी कुसुबा(जळगाव)येथील आर.सी.बाफना गो–शाळेत गुरांची रवानगी केली.ट्रक मध्ये किती गायी बैल होते हे समजू शकले नाही रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .
मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यात गो हत्या बंदीचा कायदा लागू असताना अश्या घटना घडताच कश्या असा प्रश्न उपस्थित होत असून यात मोठे रॅकेट असल्याचे जनमानसात बोलले जात आहे 
       
चोरवड सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी करूनच वाहन सोडले जात असतानाच संबधित ट्रक बद्दल अधिक संशय बळावल्याने चालकाकडे भरलेल्या माला संबंधात कोणतेच कागदपत्रे आढळली नसल्याने ट्रकची झाडाझडती घेतली त्यानंतर गुरांनी भरलेला ट्रक व त्यात गुरांची अवैध वाहतूक होत 

असल्याचे लक्षात येताच रावेर पोलिसात खबर देऊन सादर गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.सीमा तपासणी अधिकारी चोरवड श्रीकांत महाजन यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यवाही केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!